कोलकाता : हिंदूत्व काय आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय करायचे आहे, या मुद्यांवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले. पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात संघाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भागवत यांनी स्वयंसेवकांना हिंदूत्वाबद्दल मार्गदर्शन केले.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले अनेक अडचणी आल्या असतील, त्या ते अडथळ पार करून सर्वजण उपस्थित आहेत. हा आग्रह का आहे? संघाला काय करायचे आहे? एका वाक्यात या प्रश्नाचे उत्तर द्यायचे असेल, तर संघ संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करू इच्छितो. या मुद्यावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले हिंदू समाजाचे संघटन का? कारण या देशाचा उत्तरदायी समाज हिंदू समाज आहे. अमृत वचन तुम्ही ऐकले. भारतवर्ष हे केवळ भुगोल नाहीे. भुगोल छोटा मोठा होत राहतो. पण, भारत तेव्हा म्हटले जाते, जेव्हा त्याचा एक स्वभाव असतो. भारताचा एक स्वभा आहे. त्या स्वभावासोबत आपण राहू शकत नाही, असे ज्यांना वाटले, त्यांनी त्यांचा वेगळा देश बनवला असे भाष्य सरसंघचालक भागवत यांनी केले.
भारत-पाक फाळणीवर भाष्य
स्वाभाविक हे आहे की, जे वेगळे झाले नाहीत, त्या सगळ्यांना भारत नावाचा स्वभाव हवा आहे. हा भारत नावाचा स्वभाव आजचा नाहीे. १५ ऑगस्ट १९४७ नंतर असे नाही. तो त्यापेक्षाही प्राचीन आहे. जेव्हा जगाच्या इतिहासाने डोळे उघडले, त्याने या भूभागावर; ज्याला भुगोलामध्ये इंडो-इराणीय प्लेट म्हणतात, त्या भूभागावर राहणा-या सगळ्यांमध्ये हाच स्वभाव असल्याचे बघितले असे मोहन भागवत इतिहासातील दाखला देत म्हणाले.
विविधता स्विकारून हिंदूची वाटचाल
तो स्वभाव काय आहे, जगाची विविधता स्विकारून हिंदू वाटचाल करतो. सगळ्यांची आपापली वैशिष्ट्ये असतात. हिंदूंना माहितीये की, ही वैशिष्ट्ये ज्या एका सत्याचा आविष्कार आहे, ते सत्य एकच आहे; सृष्टीच्या चराचरात तेच एक आहे, जे बदलत नाही.जे आधीही होते, आजही आणि नंतरही राहील. तेच शाश्वत आहे. बाकी सगळे बदलत राहते. तो बदलही त्या एकाची अभिव्यक्ती असते. त्यामुळे हल्ली म्हणतात विविधतेमध्ये एकता! पण हिंदू हे जाणतो. त्याला हे समजते की, एकतेची ही विविधता आहे, वैशिष्ट्ये आहेत असे मोहन भागवत म्हणाले.