लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि आपल्या सर्वांचे हित डोळ्यांसमोर ठेवून आज आम्ही बाभळगाव येथे सहकुटुंब विधानसभेच्या मतदानाचा हक्क बजावला असून आपण सर्वांनीही मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन लातूर ग्रामिण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी यावेळी केले.
यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, रीड लातूरच्या संस्थापिका दिपशीखा धिरज देशमुख यांनी मतदानाचा हक्क बाभळगाव येथील मतदान केंद्रावर बजावला.