24.3 C
Latur
Monday, January 27, 2025
Homeमुख्य बातम्याखच्चीकरण रोखण्यासाठी शिवसेना सोडली : मुख्यमंत्री

खच्चीकरण रोखण्यासाठी शिवसेना सोडली : मुख्यमंत्री

कोल्हापूर : महाविकास आघाडीत असताना बाळासाहेबांचे विचार मरु लागले होते. शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले होते. नेतृत्व चुकत असल्याचे लक्षात आले होते. मग बाळासाहेबांची भूमिका मांडण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले. आमचे पाऊल जर चुकले असते तर ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष जनतेने केला नसता. तुम्ही देखील इतक्या मोठ्या संख्येने येथे आला नसता, असे शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवसेनेच्या अधिवेशनात बोलताना सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घाणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

आज बाळासाहेब असते तर राम मंदिर पूर्ण होताना आणि कलम ३७० हटवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतूक केले असते. परंतु जे वारसा सांगत आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारला नाही. यामुळे हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही. तुमच्याकडे असतो तो पर्यंत तो व्यक्ती चांगला असतो. परंतु गेल्यावर तो कचरा होतो. तो गद्दार होतो. आता एकेदिवशी हा महाराष्ट्र तुम्हाला कचरा केल्याशिवाय राहणार नाही, अशा घणाघात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. आज त्यांनी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला.

मग लोकांचे हे प्रेम मिळाले नसते
आम्ही अनेक ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी रात्री-अपरात्री हजारो लोक स्वागतासाठी येतात. लोकांचे हे प्रेम कामातून, वागण्यातून मिळाले आहे. आम्ही चुकीचे केले असते तर लोकांचे हे प्रेम मिळाले असते? बाळासाहेबांनी सांगितले होते काँग्रेससोबत जाण्यापेक्षा माझे दुकान बंद करेल. मग आज त्याच काँग्रेससोबत तुम्ही बसला आहात. आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले? सावरकरांचा अपमान केला तेव्हा कुठे गेले तुमचे हिंदुत्व? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR