लोकशाही वाचवण्यासाठी देशात दुसरा स्वातंत्र्य संग्राम लढावा लागेल

बुलडाणा : प्रतिनिधी
देशाला स्वातंर्त्य मिळाल्यानंतर या देशाचा खरा मालक सर्वसामान्य नागरिक ठरला होता. मात्र, आज देशात जनतेचे राज्य नसून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार निवडक उद्योगपतींसाठी व्यवस्था चालवत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बुलडाणा येथे काँग्रेसच्या ‘व्होट चोर, गद्दी छोड’ या विशेष अभियानांतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मध्य प्रदेशचे माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव हे विशेष निरीक्षक म्हणून उपस्थित होते. पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी मतदार याद्यांमधील कथित गैरव्यवहार, एसआयआर प्रक्रियेतील त्रुटी, निवडणूक आयोगाची भूमिका आणि खाजगी कंपन्यांचा हस्तक्षेप यावर सविस्तर आकडेवारीसह गंभीर आरोप केले.

मतदार नोंदणी आणि वगळणी प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवताना सपकाळ म्हणाले, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा बदल करणे हा अधिकार उपविभागीय अधिकारी किंवा निवडणूक निर्णय अधिका-यांचा असतो. मात्र, आज हे अधिकारी केवळ कागदपत्रे डिजिटल स्वरूपात अपलोड करण्याचे काम करत आहेत. प्रत्यक्ष यादीत बदल करण्याचे कोणतेही अधिकार त्यांच्या हातात राहिलेले नाहीत.

जिल्हाधिकारी व मुख्य निवडणूक अधिकारीही हतबल
जिल्ह्याचे मुख्य नोंदणी अधिकारी असलेले जिल्हाधिकारी स्वत:चे नावही यादीत टाकू किंवा काढू शकत नाहीत. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्याकडेही या संपूर्ण डिजिटल डेटाचा युझरनेम किंवा पासवर्ड नाही. चोकलिंगम यांनीही यासंदर्भात १० पत्रे लिहून एसआयआरमधील अनियमिततांकडे लक्ष वेधले आहे.

खासगी कंपनीचा हस्तक्षेप
एसडीओ, जिल्हाधिकारी किंवा राज्याच्या निवडणूक आयोगाकडे अधिकार नसतील, तर मग ही नावे कोणाच्या इशा-यावर समाविष्ट किंवा वगळली जात आहेत? एका खाजगी कंपनीला थेट कंत्राट देण्यात आले असून, ती खाजगी यंत्रणा स्वत:च्या मर्जीने नावे टाकणे आणि वगळण्याचे काम करत आहे. हा प्रकार अत्यंत संशयास्पद आणि लोकशाहीला घातक आहे.

महाराष्ट्रात ३.५ कोटी मतदार वगळण्याचा घाट
महाराष्ट्रातील मतदार आकडेवारीचा ताळेबंद मांडत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ७८ लाख मतदार नोंदणीकृत होते. मात्र, एसआयआर प्रक्रियेनंतर अब्सेंट (गैरहजर), डुप्लिकेट (दुबार), डेथ (मयत) आणि ट्रान्सफर्ड (स्थलांतरित) अशा वर्गवारीत तब्बल २ कोटी ३० लाख मतदार दाखवण्यात आले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|मायक्रो फायन्सच्या कर्जातून 26 वर्षीय युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये नेमकं सांगितलं?
01:22
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथे ऊस जळून खाक #breakingnews #marathinews
01:05
Video thumbnail
Nanded|खासदारांच्या गावातच मायक्रो फायनान्सचा वसुलीचा तगादा? महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
04:15
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा परिषदेत अनागोंदी कारभाराचा आरोप! आशाताई भिसेंनी मांडले कागदपत्रे
03:55
Video thumbnail
Nanded|नांदेड शेतकरी चंद्रकांत शिंदे खून प्रकरण: तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी, संचालक फरार
01:00
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पाणीचोरीविरोधात मोठी कारवाई! २८ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या, पाइप जप्त
02:24
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ महोत्सव! महिला उद्योजिका पॉवर बाजार ३० ऑक्टोबरपासून
02:35
Video thumbnail
Latur|लातूर बसस्थानकात घाणीचं साम्राज्य! काँग्रेसची पाहणी, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न
07:52
Video thumbnail
Latur|लातूर रोडवर कबीर गॅरेजमध्ये चोरी! ऑक्सिजन सिलेंडर लंपास, चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल
01:05
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी | हैबतपूर शिवारातील घटना
00:59
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये साडेचार कोटींचं बसस्थानक तयार, उद्घाटन कधी? | विद्युत फिटिंगचं काम रखडलं
01:00
Video thumbnail
Nanded|केएफ फायनान्स आणि कुबेरफल एकच? शेतकरी मृत्यू प्रकरणात पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा
02:13
Video thumbnail
“नाना पटोले काय माझे मालक आहेत का?” अशोक चव्हाणांचा संतप्त सवाल #breakingnews #digitalekmat
00:27
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये उपवर्गीकरण आरक्षणाविरोधात मोर्चा | आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर
01:43
Video thumbnail
Latur|बेलगावात शॉर्टसर्किटमुळे ऊसपिकाला आग |३ एकर ऊस जळून खाक, साडेचार लाखांचे नुकसान #breakingnews
01:05

Latest news