18 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeराष्ट्रीयझारखंडमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान

झारखंडमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान

रांची : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचार सोमवारी समाप्त झाला. येथे पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी तर उर्वरित ३८ जागांसाठी दुस-या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ‘इंडिया’ आणि रालोआ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) अशा दोन्ही आघाड्यांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे. भाजपने केलेल्या जोरदार टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर, आरोपांच्या फैरी आदींनी निवडणूक प्रचाराचा पहिला टप्पा गाजला.

दरम्यान, ‘झारखंडमध्ये आदिवासींची लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. येथे भाजपचे सरकार आल्यास घुसखोरांची ओळख पटवून त्यांना हुसकावून लावण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. तसेच त्यांनी बळकावलेल्या जमिनीवर पुन्हा दावा केला जाईल, आदिवासी महिलांशी विवाह करणा-या घुसखोरांना जमिनीचे हस्तांतरण रोखण्यासाठी कायदा आणला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

भाजपकडून धार्मिक ध्रुवीकरण : काँग्रेस
झारखंडमध्ये भाजपचा प्रचार केवळ सांप्रदायिक ध्रुवीकरणावर केंद्रित आहे. १० वर्षांच्या सत्तेनंतरही भाजप केवळ धार्मिक ध्रुवीकरणावर मते मागत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR