30.2 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeराष्ट्रीयनीट-यूजी फेरपरीक्षेत टॉपर्स घटले!

नीट-यूजी फेरपरीक्षेत टॉपर्स घटले!

नवी दिल्ली : नीट-यूजी परीक्षेचा सुधारित निकाल नॅशनल टेस्ंिटग एजन्सीने (एनटीए) जाहीर केला. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले होते त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २३ जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आल्यानंतर आता नवी गुणवत्ता यादीही जाहीर झाली. जुन्या गुणवत्ता यादीत ६७ टॉपर होते, त्यांची संख्या नव्या गुणवत्ता यादीत ६१ पर्यंत खाली घसरली आहे. फेरपरीक्षेसाठी १,५६३ उमेदवारांपैकी ८१३ जण म्हणजे ५२ टक्के लोक उपस्थित व ४८ टक्के जण अनुपस्थित होते.

चंडीगड केंद्रावर दोन विद्यार्थी फेरपरीक्षा देणार होते, पण ते गैरहजर राहिले. झज्जर येथील परीक्षा केंद्रांवर ४९४ पैकी २८७ विद्यार्थ्यांनी म्हणजे ५८ टक्के जणांनी फेरपरीक्षा दिली होती. हरयाणा केंद्रातील सहा विद्यार्थ्यांनी ग्रेस गुणांच्या बळावर १०० टक्के गुण मिळविले होते, असा आरोप झाला होता. या परीक्षेत दिलेले ग्रेस गुण रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर फेरपरीक्षेचा पर्याय उपलब्ध करून दिला. नीट-यूजी परीक्षेत ६७ जणांनी ७२० म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळविले होते. मात्र फेरपरीक्षेतील एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळालेले नाहीत.

समुपदेशन ६ जुलैपासून : नीट-यूजीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशाची प्रक्रिया येत्या ६ जुलैपासून सुरू होणार आहे. बालोद (छत्तीसगड), दंतेवाडा (छत्तीसगड), सुरत (गुजरात), मेघालय, बहादूरगड (हरियाणा), चंडीगड येथे नीट-यूजीची फेरपरीक्षा घेण्यात आली होती. नीट-यूजीची परीक्षा ५ मे रोजी देशभरातील ४७५० केंद्रांवर झाली होती. त्याला २४ लाख विद्यार्थी बसले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR