मुंबई : प्रतिनिधी
कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. दरम्यान कुडाळमध्ये पर्यटकांनी स्थानिकांशी हुज्जत घालत मारहाण केली आहे. इनोव्हा कारने तीन दुचाकी वाहनांना धडक दिल्यावरून वादावादी झाली आहे.
दरम्यान, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी पर्यटन स्थळे आणि समुद्रकिना-यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कोकणात देखील मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. दरम्यान कुडाळमध्ये पर्यटकांनी स्थानिकांशी हुज्जत घालत मारहाण केली आहे. इनोव्हा कारने तीन दुचाकी वाहनांना धडक दिल्यावरून वादावादी झाली आहे. कुडाळमधील व्यावसायिकाला इनोव्हा कारमधील पर्यटकांनी हुज्जत घालत बेदम मारहाण करत पर्यटकांनी कुडाळमध्ये धिंगाणा घातला. हे प्रकरण आता पोलिस ठाण्यात गेले आहे.
याप्रकरणी पोलिस परस्परविरोधी तक्रारी घेऊन मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, स्थानिकांना मारहाण का केली? त्या पर्यटकांना आम्हाला सुपुर्द करा अशी मागणी पोलिसांकडे स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे पोलिस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण आहे.