28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरअक्कलकोटमध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

अक्कलकोटमध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

अक्कलकोट – सलग सुट्ट्या, दत्त जयंती आणि २०२३ या वर्षाची समारोपाकडे चालू असलेली वाटचाल याचा औचित्य साधून अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. या पार्श्वभूमीवर मंजूर झालेला तीर्थक्षेत्र विकास आराखडा तातडीने अंमलात आणावा, अशी अपेक्षा स्वामी भक्तांमधून व्यक्त होत आहे.

शनिवार, रविवार आणि सोमवार अशा तीन सलग सुट्ट्या आल्याने राज्यभरातील भाविक दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत. नजर जिकडे जाईल तिकडे चार चाकी वाहने, ठीक ठिकाणी वाहतुकीची कोंडी आणि गर्दीच गदीं असे चित्र रविवारचे होते. गाड्या पार्किंगला लावण्यास अक्षरशः कुठेही जागा नव्हती, अशी परिस्थिती होती. पोलिसांनी मात्र आहे त्या परिस्थितीत गदीं हाताळण्याचा प्रयत्न केला. यात पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी स्वतः पुढाकार घेत दिवसभर शहरामध्ये फिरून पार्किंग आणि वाहतुकीचे अडथळे दूर केले. मुख्य म्हणजे मंदिराकडे येणारे जवळचे रस्ते आणि गाड्या जागोजागी बॅरिकेडस लावून थांबविण्यात आल्याने स्वामी भक्तांना काही अंशी दिलासा मिळाला. परंतु अक्कलकोटची गदीं पाहता ही गदीं आता सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रणेला न झेपणारी आहे. त्यामुळे यासाठी आता शिडीं, पंढरपूरच्या धर्तीवर राज्य सरकारने अक्कलकोटचा विकास आराखडा राबवून त्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मध्यंतरी अक्कलकोट शहरासाठी ३६८ कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. परंतु हा आराखडा लवकरात लवकर झाल्यास स्वामी भक्तांची सोय होणार आहे. मागच्या दहा वर्षांचा विचार करता भाविकांची संख्या ही दुपटीने तिपटीने वाढली आहे त्यामुळे लॉजेस किंवा हॉटेल्स असतील या सर्वच गोष्टी अपुऱ्या पडत आहेत. अपुऱ्या सुविधांमुळे हजारो भाविक हे सोलापूरमध्ये मुक्कमाला राहात आहेत. इतर दिवशी थोडीशी गर्दी कमी असली तरी सलग सुट्ट्याच्या काळात मात्र नियोजनाचा बोजवाराच उडत चालला आहे. यामुळे पोलिसांना आता इतर गोष्टीकडे लक्ष द्यायला सुध्दा वेळ नाही. पोलिसांकडे असलेली पोलिसांची संख्या पाहता सध्याची गर्दी न पेलवणारीच आहे यात आता जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांनी अक्कलकोटकडे गांभीर्यान लक्ष देऊन नियोजनामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, असे बोलले जात आहे.

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून हजारो भाविकांचा लोंढा स्वार्मीच्या दर्शनासाठी येत आहे. यासाठी देवस्थान समितीकडूनही चोख नियोजन करण्यात येत आहे. अन्नछत्र मंडळातील भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR