15.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात १२ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या

राज्यात १२ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या

निपुण विनायक आरोग्य सचिव, कुंदन उद्योग विभागाच्या प्रधान सचिव जितेंद्र डुडी पुण्याचे तर संतोष पाटील साता-याचे जिल्हाधिकारी

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात मोठे फेरबदल सुरू केले असून, आज आणखी १२ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या. मिलिंद म्हैसकर यांची वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी, डॉ. निपुण विनायक यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली तर वेणुगोपाल रेड्डी यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी साता-याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची तर त्यांच्या जागी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

राज्यातील महायुती सरकारमध्ये नेतृत्वबदल झाल्यानंतर प्रशासनात मोठे बदल केले जात आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर गेल्या आठवड्यात २१ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आज आणखी १२ अधिका-याच्या बदल्या करण्यात आल्या. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सचिव जयश्री भोज यांची अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

विनिता वेद सिंघल यांची पर्यावरण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली तर त्यांच्या जागी आय. ए. कुंदन यांची कामगार विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. मिलिंद म्हैसकर यांनी वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागी डॉ. निपुण विनायक यांची आरोग्य विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. वेणुगोपाल रेड्डी यांची उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी तर हर्षदीप कांबळे यांची सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. विकासचंद्र रस्तोगी यांची कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR