30.3 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeसोलापूरभारती विद्यापीठात अभिजीत कदम यांना आदरांजली

भारती विद्यापीठात अभिजीत कदम यांना आदरांजली

सोलापूर : भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ चिरंजीव स्वर्गीय अभिजीत दादा कदम यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापुर येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

सुरुवातीला उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी, सौ अंजली शिंदे व अनंता भिलारे यांनी अभिजीत पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला. इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी अभिजीत दादांच्या स्मृतीला उजाळा देताना त्यांच्या कार्याचा गौरव उद्गार केला. अभिजीत दादा हे एक कुशल संघटक तसेच एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते असे त्यांनी सांगितले. त्यांना फुटबॉल मध्ये विशेष रुची होती. भारती विद्यापीठाचा प्रगतीचा आलेख हा चढता ठेवणे हीच अभिजीत दादांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR