24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रकर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

कर्जत : प्रतिनिधी
ऐन गणेशोत्सवात कर्जत तालुक्यात चिकणपाडा गावात तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली. एकाच कुटुंबातल्या ९ वर्षांच्या मुलासह त्याच्या आई-वडिलांची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे महिला ७ महिन्यांची गर्भवती होती.

महिलेसह मुलाचा मृतदेह नाल्यात फेकला होता. तर पुरुषाचा मृतदेह घरात होता. पोलिसांनी या प्रकरणी कुटुंबातल्याच एका सदस्याला ताब्यात घेतले.

याबाबत मिळालेली माहिती असी की, नेरळ कळंब रस्त्यावर असणा-या नाल्यात मदन पाटील यांच्या मुलाचा आणि पत्नीचा मृतदेह आढळला. मुलाचे नाव विवेक पाटील तर पत्नीचे नाव अनिशा पाटील असे आहे. हे दोन मृतदेह आढळल्यानंतर जेव्हा ग्रामस्थ मदन पाटील यांच्या घरी गेले तेव्हा तिथे मदन यांचाही मृतदेह आढळून आला. मदन पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यामुळे ही हत्या असल्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला.
तिहेरी हत्याकांड प्रकरणी अनिशा यांचा भाऊ रुपेश याने पोलिसात तक्रार दाखल केली. चिकणपाडापासून दीड किमी अंतरावरच अनिशा यांचे माहेर आहे. रुपेश यांच्या तक्रारीनुसार मदन पाटील यांचा नातेवाईक असलेल्या हनुमंत पाटील यानंच तिघांची हत्या केल्याचा संशय आहे.

संपत्तीच्या वादातून ही हत्या झाली असावी असा संशय पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर व्यक्त केला आहे. पाटील कुटुंब हे मुळचे कळंब बोरगाव इथले आहे. मदन यांचे वडील जैतू पाटील यांनी चिकणपाडा इथे जागा घेऊन घर बांधले होते. मदनच्या लग्नानंतर हे घर त्यांच्या ताब्यात दिले होते. मात्र अर्धं घर नावावर करत नसल्याच्या कारणावरून हनुमंत पाटील यांच्याशी मदन पाटील यांचा वाद होत होता. यातूनच हा खून झाला असल्याचा संशय आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR