कुर्डुवाडी : मुलाकडून होणा-या सततच्या शिवीगाळीला व त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक असलेल्या पित्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
बाळासाहेब पाटील (वय ५६, रा. सापटणे भो., ता. माढा) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. मृत बाळासाहेब पाटील यांचा थोरला मुलगा निखिल याने कुडूवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेला धाकटा मुलगा सौरभ (वय २४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृत बाळासाहेब पाटील यांचा धाकटा मुलगा सौरभ हा नोकरी नाही म्हणून एखादा व्यवसाय, उद्योगधंदा सुरू करून द्या असे म्हणून गेल्या काही दिवसांपासून वडिलांना वारंवार त्रास देतहोता. एवढ्यावरच न थांबता तो वडिलांना मारहाणही करत होता. या त्रासाला कंटाळून बाळासाहेब पाटील यांनी कुडूवाडी-पंढरपूर रेल्वेमार्गावर लऊळ येथे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सारिका गटकूल या करीत आहेत.