27.8 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeपरभणीगोदावरी नदी पात्रात ट्रक कोसळला; २ गंभीर जखमी

गोदावरी नदी पात्रात ट्रक कोसळला; २ गंभीर जखमी

परभणी : धूळे येथून कापड घेऊन उदगीरकडे जात असलेल्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने साड्यांनी भरलेला ट्रक थेट गोदावरी नदीच्या पात्रात कोसळला. ही घटना परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर खळी- दुसलगाव परिसरात गुरूवार, दि.६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत चालक आणि अन्य एक असे दोघे जखमी जखमी झाले आहेत.

धुळे येथून लातूर जिल्ह्यातील उदगीरकडे जाणारा ट्रक क्रमांक एमएच १८ एम ७४२८ हा परभणी ते गंगाखेड रस्त्यावरील गोदावरील नदी पूल परीसरात ट्रकचा स्टेरींग रॉड तुटल्याने ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ट्रक गोदावरी नदीत पलटी झाला. ट्रक नदीत कोसळल्याचे पाहताच या ठिकाणी असलेल्या झारेकरी युसूफ बेग बिबन बेग, अफसर बेग, दत्ता सोळंके यांनी नदी पात्रात उडी मारून ट्रकच्या कॅबीनमध्ये अडकलेल्या शोएब खान गफार खान (३०) या ट्रक चालकाला व जुबेर अब्दुल रहमान मणियार (१८) दोघेही रा. धुळे यांना पाण्याबाहेर काढले.

त्यानंतर उत्तम रंगनाथ पवार यांनी दोन्ही जखमींना दुचाकीवरून गंगाखेड उपजिल्हा रूग्णालयात दारखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना घुगे, परीचारिका प्रणिता शिंदे, गोविंद वडजे आदिंनी प्रथमोपचार करून विष्णू व्होरे, रावण भालेराव, किरण कौसे, गोविंद ठाकूर दिगंबर कदम आदिंच्या मदतीने पुढील उपचारासाठी दोन्ही जखमींना परभणी येथे पाठवण्यात आले.

या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्दार्थ इंगळे, पोलिस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, खळी येथील पोलिस पाटील पुंडलीक सुरवसे, तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे, नायब तहसीलदार सुनिल कांबळे आदिंनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR