वॉशिंग्टन : वाढवून या सरकारी कर्मचा-यांचा पगार वेळच्यावेळी केला जातो. परंतू अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने बोल्ड निर्णय घेतला आहे. त्यांनी सरकारी कर्मचा-यांनाच खासगी कंपन्यांप्रमाणे कामावरून काढून टाकले आहे.
अमेरिकेच्या सरकारने शुक्रवारी ९५०० हून अधिक कर्मचा-यांना कामावरून कमी केल्याचे कळविले आहे. ट्रम्प यांचे सल्लागार मस्क यांनी सरकारी नोकरदार कमी करण्याची मोहिम हाती घेतली आहे. काढून टाकण्यात आलेल्या कर्मचा-यांमध्ये बहुतांश कर्मचारी हे जमिनीवरील व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेण्यासारख्या सेवांशी संबंधीत होते. या कर्मचा-यांना आपली नोकरी जाईल याचा हासभासही नव्हता.
गृह, ऊर्जा, माजी सैनिक व्यवहार, कृषी, आरोग्य आणि मानव सेवा विभागातील कर्मचा-यांची नोकरी गेली आहे. ट्रम्प यांनी यासाठी प्रोबेशनरी वर्कर श्रेणीतील कर्मचा-यांना निवडले आहे. या लोकांच्या नोकरीची सुरक्षा खूप कमी असते. याचाच फायदा ट्रम्प प्रशासनाने उठविला आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी सरकारी कर्मचा-यांना स्वत:हून नोकरी सोडण्याचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये आठ महिन्यांचा पगार आणि त्यांचे जे काही पीएफसह अन्य फायदे असतील ते देण्याची ऑफर दिली होती. ही ऑफर तब्बल ७५ हजार कर्मचा-यांनी स्वीकारली आहे. यात आता या आणखी १० हजार जणांची भर पडली आहे.