28.8 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रहळदीला मिळतोय विक्रमी बाजारभाव

हळदीला मिळतोय विक्रमी बाजारभाव

सांगली : हळदीचा नवा हंगाम सुरू झाला असून, सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी नवीन हळदीच्या सौद्यांना सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राजापुरी हळदीची ४९७ क्विंटल, तर परपेठ हळदीची ११७ क्विंटल आवक झाली.

सरासरी १५ हजार रुपये क्विंटल भाव राहिला. पहिल्या दिवशी दोन हजार २२८ पोती विक्रीसाठी आली होती.

सांगली मार्केट यार्डात नवीन हळद सौदे शुभारंभ जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील व बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते केला. मुहूर्ताचे सौदे नवीन हळद सौदे शुभारंभाला गणपती कृषी जिल्हा औद्योगिक सोसायटी येथून सुरुवात झाली. प्रथम हळद शेतीमाल पोत्यांचे पूजन करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR