21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रएकाच रात्री दोन एटीएम फोडले

एकाच रात्री दोन एटीएम फोडले

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच रात्री दोन वेगवेगळ्या कंपनीचे एटीएम फोडण्यात आले आहेत. एका एटीएममधून अंदाजे २२ लाख तर दुस-या एटीएममधून अंदाजे १६ लाख असा एकूण अंदाजे ३८ लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, पोलिसांकडून तपास केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चापानेर आणि वैजापूरमध्ये दोन एटीएम फोडण्यात आल्याची घटना आज (१७ जानेवारी) सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही एटीएम एकाच रस्त्यावर आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार चापानेर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममधून २२ लाख आणि वैजापूरच्या आयडीबीआय बँकेच्या एटीएममधून १६ लाख चोरीला गेल्याची माहिती आहे. या दोन्ही घटनांनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच, आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

सीसीटीव्हीवर ब्लॅक स्प्रे मारला…
कन्नड तालुक्यातील चापानेर आणि वैजापूरमध्ये एकाच रात्री दोन एटीएम फोडल्याने खळबळ उडाली आहे. हे दोन्ही एटीएम एकाच मार्गावर असल्याने, एकाच टोळीने ही चोरी केली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे एटीएममध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी ओळख लपवण्यासाठी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमे-यावर स्प्रे मारला. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करत गॅस कटरने दोन्ही एटीएम कापले. दोन्ही एटीएममधून अंदाजे ३८ लाख रुपये पळवल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR