सोलापूर – इस्टाग्रामवर स्टोरी ठेवण्याच्या कारणावरून दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तिघांनी फायटरने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आफताब अतिक शेख (वय २०, रा. संगमेश्वरनगर अक्कलकोट रस्ता) याने दिलेल्या फिर्यादीवरून बापू आयवळे, अर्जुन जावीर व अवि गायकवाड (तिघे रा. धोत्रीकर वस्ती) यांच्याविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दयानंद महाविद्यालयासमोर टॉम अँड जेरी कॅफेसमोर काही विद्यार्थी फिर्यादीचा मित्र सॅम उबाळे याला मारहाण करीत होते. हे समजल्यानंतर आफताब हा तेथे गेला असता इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवण्याच्या कारणावरून तिघांनी आफताब व सॅम या दोघांना फायटरने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार आर. डी. दुधाळे हे करीत आहेत.