17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरपंढरपुरात ‘मविआ’चे दोन उमेदवार; अनिल सावंत-भालके यांच्यात लढत

पंढरपुरात ‘मविआ’चे दोन उमेदवार; अनिल सावंत-भालके यांच्यात लढत

लातूर : निवडणूक डेस्क
राष्ट्रवादी शरद पवार गटाने अधिकृत ‘ट्विटर’वरुन पाचवी उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत शरद पवारांकडून माढा, पंढरपूर आणि मोहोळमधील सस्पेन्सवर अखेर पडदा टाकला आहे. शरद पवारांनी माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.

शरद पवार गटाची पाचवी यादी
अभिजीत पाटील – माढा
संगीता वाजे – मुलुंड
गिरीश कराळे – मोर्शी
अनिल सावंत – पंढरपूर
राजू खरे – मोहोळ

पंढरपुरात ‘मविआ’चे दोन उमेदवार
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून यापूर्वीच काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. शरद पवारांनी नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते अकलूज येथे अनिल सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.

यामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे, मनसेकडून दिलीप धोत्रे, काँग्रेसकडून भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत हे पंढरपूरच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

शरद पवार गटाचे ८८ उमेदवार
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत ८८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यातील पहिल्या यादीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ४५ उमेदवारांची नावाची घोषणा करण्यात आली होती. दुस-या यादीत २२, तिस-या यादीत ९, चौथ्या यादीत ७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता पाचव्या यादीत शरद पवारांकडून ५ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR