22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, ७ ठार

समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, ७ ठार

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात सात जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जालन्यातील कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोन कारची समोरासमोर धडक बसून हा अपघात घडला आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला असून यात सात जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असून ४ जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जालन्यातील कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूरकडून मुंबईकडे जाणा-या कारला विरुद्ध दिशेने डिझेल भरून येणा-या स्विफ्ट डिझायनर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्यानंतर इर्टीगा आणि स्विफ्ट डिझायर या दोन्हीही कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्या. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कडवंची गावाजवळ ही घटना घडली. यात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर चार प्रवासी गंभीर जखमी आहेत.

अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलिस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. पण हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

रात्री अकराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या सहा जणांची ओळख पटली आहे. मुंबईतील मालाड भागातील मन्सुरी कुटुंबातील तिघांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे तर बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील उमरखेड येथील दोघांचा तर पिंपळगाव बुद्रुक येथील एकाचा मयतांमध्ये समावेश आहे. एकाची ओळख अजून पटली नाही. या घटनेतील चार गंभीर जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या तर एकावर जालन्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या मन्सुरी या एकाच कुटुंबातील तिघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला असून याच कुटुंबातील इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR