19.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रदोन कारची समोरासमोर धडक; एक ठार, गंभीर जखमी

दोन कारची समोरासमोर धडक; एक ठार, गंभीर जखमी

नाशिक : गंगापूर धरण परिसरात पुलाचा कठडा तोडून कार गोदावरी नदीपात्रात कोसळल्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. सौंदाणे-देवळा रस्त्यावर दोन कारची समोरासमोर धडक झाली आहे. यात एक जण जागीच ठार झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सौंदाणे-देवळा रस्त्यावर पावजी देव फाट्याजवळ हुंडाई सेंट्रो कार व एम. जी. हेक्टर या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. गणेश सुभाष ततार (रा. कळवण) असे अपघातातील मयताचे नाव आहे.

सप्तशृंगी गडावरून परतताना काळाचा घाला
अपघातातील चारही जखमी हे मध्य प्रदेश राज्यातील इंदौर येथील असल्याची माहिती असून ते सप्तशृंग गडावरून दर्शन घेऊनन परतत होते. यावेळी सौंदाणे-देवळा रस्त्यावरील मातोश्री फार्मसमोर दोन कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे जमा करण्यासाठी येवला तहसील कार्यालयात जाणा-या महिलेचा कार्यालयाजवळ वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात महिलांची धावपळ होत आहे. कागदपत्रांच्या निमित्ताने अहमदननगर-मनमाड राज्य मार्गावरील येवला प्रशासकीय संकुलात जात असलेल्या उज्ज्वला चौधरी (४५, रा. रेल्वे स्टेशन) यांना एका वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR