उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी महिलांना लखपती करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र सरकारतर्फे महिला सशक्तीकरण सुरू आहे. त्यामुळे या योजनेतील महिलांना फायदा होईल. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरणामुळे महिलांना फायदा होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मोदी यांनी ही सर्वात मोठी घोषणा केली आहे. मी म्हटलं होतं देश बदलणार आणि जरूर बदलणार. ही मोदीची गॅरंटी आहे. हा अटल सेतू मुंबईकरांना देशातील लोकांना समर्पित करत आहे. आम्ही निरंतर काम करतो. जनतेची सेवा करतो. देशाच्या भल्यासाठी आम्ही काम करत आहोत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
जपान सरकारचे आभार
मोदींनी जी गॅरंटी दिली आहे. ती गॅरंटी महाराष्ट्र सरकार पुढे नेत आहे. महिलांचं सक्षमीकरण करणं हा आमचा हेतू आहे, असं मोदी म्हणाले. या सागरी सेतूमुळे मुंबई आणि रायगडचं अंतर कमी झालं आहे. माझा मित्र शिंजो अबे यांची आठवण करेन. आम्ही दोघांनी हा अटल सेतू पूर्ण करण्याचा संकल्प केला होता, असंही मोदी म्हणाले.
अटल सेतू विकसीत भारताची प्रतिमा
मी रायगडावर गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ बसलो होतो. काही संकल्प केले होते. ते पूर्ण करण्याचा हा प्रयत्न आहे. या गोष्टीला दहा वर्ष होत आहेत. संकल्प पूर्ण होत आहे. अटल सेतू हा त्यापैकीच एक आहे. अटल सेतू हा विकसीत भारताची प्रतिमा आहे. हे बदलत्या भारताचं लक्षण आहे, असंही त्यांनी सांगितलं.