17 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeसोलापूरभाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात पायथॉन विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा

भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात पायथॉन विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा

बार्शी प्रतिनिधी : बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित भाऊसाहेब झाडबके महाविद्यालय येथे बीसीए विभागाच्या वतीने १ व २ जानेवारी २०२४ रोजी पायथॉन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेची सुरुवात डॉ. प्रसन्न गव्हाणे, डॉ. वैभव बच्चूवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज गादेकर, बीसीए विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुनील नष्टे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी डॉ. गव्हाणे यांनी मार्गदर्शन करताना, डेटा सायन्सचे महत्व तसेच त्याच्या वापराबद्दल माहिती दिली.

कार्यशाळेच्या दुपारच्या सत्रात डॉ. बच्चूवार यांनी पायथॉन विषयीच्या संकल्पना व प्रॅक्टिकल टूल्सविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी डॉ. गव्हाणे यांनी डेटा विज्युलायझेशन आणि मशीन लर्निंग विषयी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात डॉ. वैभव बच्चुवार यांनी ऍडव्हान्स पायथॉनविषयीच्या संकल्पना प्रात्यक्षिकाच्या साह्याने विद्यार्थ्यांना सांगितल्या. विद्यार्थ्यांना भविष्यकाळातील उपलब्ध होणाऱ्या विविध संधीची माहिती दिली.

आयोजनासाठी बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ. वर्षाताई ठोंबरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा. सौ.अंकिता घाटे यांनी तर आभार प्रा. अतुल ढवळे यांनी मानले. कार्यशाळेसाठी प्रा. राहुल नांदेडकर प्रा. अमृता तिकटे, . सिद्धार्थ धुमाळ, .अमोल शेळगावकर, जितेंद्र गाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR