22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबईत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. वडाळा येथील अँटॉप हिल परिसरातील कमला नगरमध्ये एक तीन मजली चाळीची भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर भिंतीच्या ढिगा-यात काही जण अडकल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे अँटॉप हिल परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. शोभादेवी मौर्य (वय ४५) व झाकिरूनिसा शेख (वय ५०) अशी या दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. या दोघींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR