सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवार दि. २७ एप्रिल रोजी मतदान झाले. मतदान दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून काँग्रेस नेते तथा बाजार समितीचे माजी संचालक सुरेश हसापुरे आणि भाजपचे नेते तथा माजी संचालक आप्पासाहेब पाटील यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची, हमरीतुमरी झाली.
दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. सुरेश हसापुरे आणि आप्पासाहेब पाटील यांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे बाचाबाची झाली. दोघेही हमरीतुमरीवर आले होते. दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे मतदान केंद्रावर वातावरण गरम झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा वाद मिटला. तसेच, स्थानिक नेत्यांनीही दोघांना बाजूला घेतले, त्यामुळे दोन माजी संचालकांच्या वादावर पडदा पडला.