धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील एका गावातील एका २४ वर्षीय तरूणीवर दोन तरूणांनी तीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घडलेल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाणे येथे दि. २४ ऑक्टोबर रोजी दोघा तरूणांवर विविध कलमाखाली लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील एका गावातील एका २४ वर्षीय तरूणीला (नाव- गाव गोपनीय) सन एप्रिल २०२१ ते आजपावेतो ती तीच्या घरी एकटी असताना एका गावातील दोन तरुणांनी तीला लग्नाचे अमिष दाखविले. तीला वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता किंवा माहिती दिल्यास तीला जिवे ठार मारण्याची धमकी या दोघा तरूणांनी दिली. या प्रकरणी पीडित तरूणीने दि. २४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन दोघा तरूणावर विविध कलमाखाली लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.