23.1 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeसोलापूरसोलापुरातील मोची समाजाचे दोन नेते भाजपाच्या वाटेवर

सोलापुरातील मोची समाजाचे दोन नेते भाजपाच्या वाटेवर

सोलापूर : शहरातील मोची समाजाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे व माजी महापौर संजय हेमगड्डी यांनी विजापूरचे खासदार व माजी केंद्रीय राज्यमंत्री रमेश जिगजिन्नी यांच्या समवेत सोलापूर जिल्हा – भाजपा प्रवेश करण्यासंदर्भात चर्चा केल्याचे समजते. यासंदर्भात मोची समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक देखील झाली. जिल्ह्यामध्ये मोची समाज जवळजवळ १ लाख इतकी मतदार असून सोलापूर शहर मध्यमध्ये जवळपास ३५-४० हजार मतदार आहेत.

त्याचबरोबर दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि शहर उत्तर मतदार संघामध्ये मोची समाज मोठ्या प्रमाणात असून या समाजाला भाजपातर्फे लोकसभा उमेदवारी दिल्यास भाजप पक्ष असून संघटित होऊन व सर्व मोची समाजाचे मते भाजपकडे वळू शकतात. भंडारे आणि हेमगड्डी भाजपात प्रवेश केल्यास मोठ्या संख्येने मोची समाज आणि तरुण वर्ग भाजपात जाणार असल्याचे खात्री लायक वृत्त आहे.

त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो. महाराष्ट्रातील मुंबई,पुणे, पिंपरी चिंचवड, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, भंडारा आदी जिल्ह्यात मोची समाजाचा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सोलापूरात सुध्दा मोठ्या प्रमाणात मोची समाज आहे. भारतीय जनता पार्टी सोलापूरात मोची समाजाला संधीस दिल्यास महाराष्ट्रातला मोची व मादिगा समाज भाजपकडे वळू शकतो याचा फायदा भाजपाला नक्कीच होईल.
भंडारे नॅब निवासी शाळेचे अधिक्षक पदावर कार्यरत होते.

उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून त्यांची लौकिक आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून युवक आघाडीपासून अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. २००२ पासून महापालिकेत प्रतिनिधीत्व करतात. तसेच म हापालिका स्थायी समिती सभापती आणि महापालिका सभागृह नेते म्हणून कार्याचा ठसा उमटविला आहे. मोची समाजात अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तरुण वर्गाचा मोठा संपर्क आहे. माजी महापौर संजय हेमगड्डी हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. ते १९९७ पासून महापालिकेत प्रतिनिधीत्व करतात.यांचाही चांगला जनसंपर्क आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR