सेलू : सेलू येथील विष्णू दगडू ढोले तसेच जिंतूर येथील विजय अण्णा ठोंबरे या दोघांना परभणी व जालना या दोन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी संगीता सानप यांनी तसा आदेश काढला आहे.
सेलू येथील विष्णू ढोले यांच्यावर परभणी, सेलू व पाथरी पोलिस ठाण्यांतर्गत विविध आठ गुन्हे दाखल असून त्यांना परभणी जिल्ह्यातील पूर्णा व पालम तसेच जालना जिल्ह्यातील मंठा आणि परतुर हे चार तालुके वगळता ७ मार्चपासून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. तर जिंतूर येथील विजय अण्णा ठोंबरे राहणार भोसरी तालुका जिंतूर यांना देखील परभणी व जालना या दोन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याचे आदेश सेलूच्या उपविभागीय दंडाधिकारी संगीता सानप यांनी काढले आहेत.
दरम्यान परभणी येथील काही दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे विष्णू ढोले यांची हद्दपारची शिक्षा रद्द करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.