25.7 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रतलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

नागपूर : प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात असलेल्या मोहगाव झिलपी तलावात दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर शहरातील दिघोरी परिसरातील झिलपी तलावाच्या परिसरात मुले फिरायला आली होती.

हे सर्व वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी असून एकाच परिसरात राहत असल्यानं त्यांची ओळख होती. विरसेन विठोबा गजभिये व गौरव लीलाधर बुरडे (वय १५ वर्षे) या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या विरसेन व गौरवची पोहण्याची इच्छा झाल्याने तलावात उतरले. इतर ५ जणांनी तलावात जाण्यापासू त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कुणाचे ऐकले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR