सोलापूर : येत्या शैक्षणिक वर्षात समग्र शिक्षा व राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार आहेत. जिल्ह्यातील दोन लाख १० विद्यार्थ्यांसह राज्यभरातील ४४ लाख ६० विद्यार्थ्यांना दोन्ही गणवेश शिवून मिळणार आहेत. विशेष महिला बचतगटांना रोजगार मिळावा, यासाठी हे गणवेश त्यांच्याकडून शिवून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी कापडाचा पुरवठा करण्यात येणार आहे.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने ई- निविदा प्रक्रिया राबवली असून एका कंपनीला चार मार्च रोजी कापड पुरवठा करण्याचा आदेश दिला आहे. गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत महिला बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. साधन केंद्रांना कापडाचा पुरवठा जिल्ह्यातील विद्यार्थी संख्येनुसार बीआरसी, सीआरसी अथवा महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोक संचालित साधन केंद्रांना कापडाचा पुरवठा केला जाणार आहे. मागणीनुसार प्रतिगणवेश कापडाचे मापानुसार मायक्रो कटिंग नंतर कापड पुरवले जाईल. त्यानंतर महिला बचत गटामार्फत कापडाची शिल ई झाल्यावर साधन केंद्राद्वारे संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना गणवेश पुरवले जाणार आहेत.
पुरवठादारांकडून कापड निर्मिती झाल्यानंतर त्याच्या दर्जाची टेक्स्टाईल कमिटीकडून तपासणी होणार आहे. कटिंगनंतर ते पॅकेटमध्ये भरून त्यावर टेक्स्टाईल कमिटीचे सोल लावण्यात येणार आहे. इयत्तानिहाय कापड स्वतंत्रपणे एका इयत्तानिहाय एका गणवेशातील शर्ट व पँट आणि फ्रॉक व सलवार कमीज बॉक्समध्ये पॅक केले जाणार आहे. त्यावर त्याविषयीचा उल्लेख केला जाणार आहे. प्रत्येक बीआरसी, सीआरसी केंद्रात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ६४ स्वतंत्र बॉक्स उपलब्ध होतील. प्रत्येकबॉक्समध्ये १०० गणवेशाच्या कापडाचेतुकडे असतील.यात एक गणवेश नियमित तर दुसरा स्काऊट गाइडचा असेल. नियमित गणवेशामध्ये मुलांसाठी आकाशी शर्ट व गडद निळ्ळ्या रंगाची पैंट तर मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असेल. आठवीच्या विद्यार्थिनीना ओढणीसाठी लागणारे कापडही पुरवले जाईल. तर स्काऊट गाइडसाठी मुलांना आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅट व पेंट तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या गडद रंगाचा स्कर्ट अथवा सलवार कमीज चा असेल, एका गणवेशाला शर्टवर शोल्डर स्ट्रिप व दोन खिसे असतील.
येत्या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या
विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सुमारे दोन लाख १० हजार विद्यार्थी आहेत. त्याविषयीचा आदेश प्राप्त झाला आहे. मात्र, अद्याप बचतगटांना काम देण्याबाबत कोणतेही निर्देश प्राप्त झाले नाहीत.असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख म्हणाले.