36.8 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात दोन तरुणी बेधुंद अवस्थेत आढळल्या

पुण्यात दोन तरुणी बेधुंद अवस्थेत आढळल्या

पुणे : पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर देशातला सगळ्यात मोठा ड्रग्ज साठा उद्ध्वस्त केला आहे. इतकी मोठी कारवाई करूनही पुण्यात ड्रग्ज सेवन करणा-यांना ड्रग्ज सहजपणे उपलब्ध होत असल्याचे चित्र आज एका व्हीडीओच्या माध्यमातून समोर आले आहे.

मराठी चित्रपट अभिनेता ‘मुळशी पॅटर्न’ फेम रमेश परदेशी यांनी एक व्हीडीओ लाईव्ह करून नशेच्या धुंदीत असलेल्या दोन मुलींची अवस्था समोर आणली आहे. त्यामुळे राज्यात नव्हे तर देशभरात जात ड्रग्जची कारवाई करणा-या पुणे पोलिसांच्या मशालीखालीच अंधार असल्याची चर्चा आता सगळीकडे होऊ लागली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील कोथरूड परिसरातील प्रसिद्ध वेताळ टेकडीवर दोन मुली दारू आणि ड्रग्जच्या नशेत धुंद असलेल्या अवस्थेत असल्याचा प्रकार रमेश परदेशी यांनी फेसबुक लाईव्ह करून दाखवला आहे. या लाईव्हमधील दिसणा-या मुलीमध्ये एक झोपलेल्या अवस्थेत आहे. तर दुसरी मुलगी शुद्ध हरपल्याच्या अवस्थेत दिसून येत आहे. या परिस्थितीत रमेश परदेशी यांनी टेकडीवर आलेल्या नागरिक आणि तरुणांच्या मदतीने मुलींच्या चेह-यावर पाणी मारलं आणि जागे करण्याचा प्रयत्नही केला. यानंतर या मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR