33.8 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeराष्ट्रीयलेखिका अरुंधती रॉय यांच्याविरोधात यूएपीए खटला चालणार

लेखिका अरुंधती रॉय यांच्याविरोधात यूएपीए खटला चालणार

नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय तसेच काश्मीर विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ. शेख शौकत हुसैन या दोघांविरोधात बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा अर्थात युएपीए अंतर्गत खटला चालवला जाणार आहे. यासाठी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी परवानगी दिली आहे. त्यांच्याविरोधात २०१० मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती.

या दोघांवर आरोप आहेत की त्यांनी २१ ऑक्टोबर २०१० रोजी एलटीजी ऑडिटोरियममध्ये एका कार्यक्रम दरम्यान भडकाऊ भाषण दिलं होतं. यामध्ये त्यांनी काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याची भाषा केली होती. या संमेलनात सैय्यद अली शाह गिलानी, एसएआर गिलानी (संमेलनाचा अँकर आणि संसद हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक), अरुंधती रॉय, डॉ. शेख शौकत हुसैन आणि वरवरा राव उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR