कराड : कराडात कृषी प्रदर्शनाचे नुकतेच उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले हे दोघेही बैलगाडीतून प्रदर्शन स्थळी आले. यावेळी उदयनराजे म्हणाले, बैलगाडीचा कासरा हातात धरला, आता राज्याचा कासरा हातात धरावा अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे, असं उदयनराजेंनी फडणवीसांना उद्देशून म्हटलं.