27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रविधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे ऐकलेले दिसत नाही

विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे ऐकलेले दिसत नाही

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये हे शरद पवारांचे म्हणणे उद्धव ठाकरे यांनी ऐकलेले दिसत नाही अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर येथे नियोजन समितीच्या बैठकीला आल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, महायुतीचे विधान परिषदेचे सर्व उमेदवार विजयी होणार असून पवार किंवा ठाकरे गटाचा एक उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष स्वबळाची तयारी करत असतात. विनय कोरे यांना किती जागा सोडायच्या याचा निर्णय वरिष्ठ घेतील. विशाळगड येथील अतिक्रमणाबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यामुळे अधिका-यांनाही मर्यादा आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपल्याला भेटल्यास त्यांची समजूत काढू. विजयी क्रिकेटरना शासनाकडून बक्षीस दिल्याबद्दल दोन्हीकडून चर्चा आहे. सतरा वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला याचा आनंद झाला पाहिजे असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR