24.2 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंचा विनोद कळायला उशीर लागला

उद्धव ठाकरेंचा विनोद कळायला उशीर लागला

‘बिनशर्ट’च्या वक्तव्यावर अमित ठाकरेंचे प्रत्युत्तर

मुंबई : प्रतिनिधी
उद्धव ठाकरेंचा विनोद मला कळायलाही दहा मिनिटे लागली. वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटले नाही. तेव्हा त्यांनी तो घेतला आणि मुलाला आमदार केले. पण या गोष्टी विसरायला नकोत. राज ठाकरेंनी जो पक्ष काढला आहे तो स्वत:च्या मेहनतीवर काढला आहे. येणा-या विधानसभा निवडणुकीत आम्ही आमची शक्ती दाखवू, असे म्हणत अमित ठाकरेंनी काका उद्धव ठाकरेंना ‘बिनशर्ट’ पाठिंब्याच्या वक्तव्याला उत्तर दिले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला.

बिनशर्त पाठिंबा दिल्याची खिल्ली उद्धव ठाकरेंनी ‘बिनशर्ट’ पाठिंबा असे म्हणत उडवली. या टीकेनंतर मनसे चांगलीच आक्रमक झालेली पाहण्यास मिळाली. आता तर उद्धव ठाकरेंचा पुतण्या आणि राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले.

या लोकसभा निवडणुकीमुळे मित्र कोण आणि शत्रू कोण हे समोर आले आहे. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिनशर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला. तर काही जणांनी भाजपाला विरोध करण्याचे नाटक करून पाठिंबा दिला. मात्र, आम्ही नाटक करणारी माणसे नाही. नाटक ही कला आहे. आणि ही कला मोदींना जमते आम्हाला जमत नाही’, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांनी जो बिनशर्त पाठिंबा दिला त्यावरून उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली. तर आता अमित ठाकरेंनीही त्यांना प्रत्युत्तर दिले.

कंबरेचे काढून डोक्याला गुंडाळलेले ‘शर्त’ : राजू पाटील
कंबरेचे काढून डोक्याला गुंडाळलेले ‘शर्त’ आणि ‘शर्ट’ असले फुटकळ शब्दच्छल करतात. ‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होतात तेव्हा काय काढलं होतं? #लब्बाडलांडगंढ्वांग_करतंय अशी पोस्ट राजू पाटील यांनी केली आहे. तसंच उद्धव ठाकरेंचं एक भन्नाट व्यंगचित्रही त्याबरोबर पोस्ट केलं आहे. ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR