दुबई : आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगणा-या मेगा फायनलसाठी पंच आणि सामनाधिका-यांची घोषणा केली आहे. ९ मार्चला दुुबईच्या मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे. कारण साखळी फेरीत भारतीय संघाने न्यूझीलंडला आधीच मात दिली आहे. त्यामुळे मानसिकरित्या भारतीय संघ सकारात्मक दृष्टिकोनासह अधिक आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. एवढेच नाहीतर मध्यफळतील बॅटिंगमध्ये दिसलेली धमक आणि चार फिरकीपटूंची जादू या गोष्टी भारतीय संघाला फायनलच्या शर्यती न्यूझीलंडपेक्षा आघाडीवर ठेवणा-या आहेत.
पण क्रिकेटच्या मैदानात ब-याचदा लक फॅक्टरचा मुद्दाही चर्चेत असतो. अंपायरच्या रुपात मॅचवेळी मैदानात दिसलेले काही चेहरे लकी ठरतात तर काही चेह-यांना अनलकीचा टॅग लागतो. भारतीय संघासाठी बहुतांश आयसीसी स्पर्धेत अनलकी ठरलेला चेहरा यंदाच्या ऑफिशियल्समध्येही होता. इंग्लंडचे पंच रिचर्ड केटलबरो असे या पंचाच नाव आहे. हा पंच असला की, भारतीय संघाने फायनल मॅच गमावली, असा सीन मागील काही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाहायला मिळाला. पण सेमीप्रमाणे फायलमध्येही हा पंच मैदानात किंवा टेलिव्हिजन अंपायरच्या रुपात दिसणार नाही. बरं झाले अनलकी अंपायरला आयसीसीने गायब केले, अशीच भावना फायनचे ऑफिशियल्स पाहिल्यावर क्रिकेट चाहत्यांची असेल.
कोण आहेत मैदानी पंच?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलसाठी पॉल रीफेल आणि रिचर्ड इलिंगवर्थ या दोघांवर मैदानातील पंचगिरीची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. भारतीय संघाने २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी रिचर्ड इलिंगवर्थ हेच मैदानी पंच होते. तिस-या पंचाच्या रुपात जोएल विल्सन, फोर्थ अंपायरच्या रुपात कुमार धर्मसेना आणि सामनाधिका-याच्या रुपात रंजन मदुगले हे काम पाहतील.