27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयपुतण्यानेच केली काका, काकू आणि ३ भावंडांची हत्या

पुतण्यानेच केली काका, काकू आणि ३ भावंडांची हत्या

१९९७ मधील घटनेचा घेतला बदला

वाराणसी : वाराणसीतील गुप्ता कुटुंबीय हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गुप्ता, त्यांची पत्नी नीतू आणि तीन मुलांचा खून करणारा दुसरा कोणी नसून राजेंद्र यांचा मोठा पुतण्या विशाल उर्फ ​​विकी आहे. ही संपूर्ण घटना विकीने एकट्याने घडवून आणली होती. सध्या तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर विकी पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणा-या वाराणसीच्या काशी झोनचे डीसीपी गौरव बन्सवाल यांनी सांगितले की, या हत्येसाठी एकच व्यक्ती जबाबदार असल्याचे समोर येत आहे, तो म्हणजे विक्की. रोहनियामध्ये काका राजेंद्र यांची हत्या केल्यानंतर, विकी पहाटेच दुस-या ठिकाणी पोहोचला आणि त्याने राजेंद्र यांच्या कुटुंबातील उर्वरित चार सदस्यांची हत्या केली. यामध्ये त्यांची पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी होती.

या घटनेत इतर कोणाचा सहभाग आहे का या प्रश्नावर डीसीपी म्हणाले की, गुप्ता कुटुंबाचा इतिहास खूप ंिहसक राहिला आहे. १९९७ मध्ये राजेंद्र यांनी जून महिन्यात आपल्या भावाची आणि वहिनीची तर डिसेंबरमध्ये वडिलांची आणि त्याच्या गार्डची हत्या केली होती. विकीने १९९७ मध्ये आई-वडिलांची हत्या करताना पाहिले होते. त्यामुळेच गेल्या दीड वर्षापासून विकी काकाच्या हत्येचा कट रचण्यात व्यस्त होता. विकीच्या संदर्भात अधिका-यांनी सांगितले की, विकीने कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन अर्थात एमसीएमध्ये मास्टर्स केले आहे आणि तो सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत होता. विकीच्या हालचालींची चौकशी केल्यानंतर असे आढळून आले की, त्याने २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान अहमदाबादमध्ये आपला मोबाईल फोन बंद केला होता. यानंतर विकी बनारसला आला.

विक्कीचा लहान भाऊ प्रशांत उर्फ ​​जुगनू याच्या चौकशीत असे समोर आले की, विक्की सुरुवातीपासूनच त्याचा काका राजेंद्र यांच्या विरोधात होता. राजेंद्र अनेकदा विकीला मारहाण करायचा. सध्या विकी जात असलेल्या सर्व ठिकाणांवर त्याला पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. मित्र आणि नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल असे अधिका-यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR