19.3 C
Latur
Saturday, November 9, 2024
Homeमहाराष्ट्रअंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून कायमचा बाहेर येणार

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून कायमचा बाहेर येणार

नागपूर : कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाच्या वतीने देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही नागपूर खंडपीठाच्या वतीने देण्यात आला आहे. २००६ च्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती

अरुण गवळीच्या त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळी याची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत मात्र त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे.

मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात तसेच इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती..
सध्या अरुण गवळी नागपूच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते. त्यानुसारच डॉन अरुण गवळीची शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR