पूर्णा : राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी ३० वर्षीय ईसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा-नांदेड लोहमार्गावर दि.१० एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पूर्णा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पूर्णा-नांदेड लोहमार्गावरील पूर्णा ते चुडावा दरम्यान नांदेडकडे निघालेल्या भरधाव राज्यराणी एक्स्प्रेसची एका ईसमास धडक लागून डोक्यात जबर मार लागून जागीच मृत्यू पावला असल्याची खबर रेल्वे चालकाने चुडावा स्टेशन मास्तर यांना दिली. पुर्णा हद्दीतील घटना असल्याने रेल्वे विभागाने पूर्णा पोलीसांना या बाबतीत कळवले. या घटनेची माहिती मिळताच पो.नि.विलास गोबाडे, सपोऊपनि.अण्णा माने, पो.शि.बंडु राठोड, पो.शि.सुधिर काळे, चापोशि. केशव मुंढे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मृत्यूदेह ताब्यात घेत पंचनामा केला.
यावेळी सदरील ईसमाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची ओळख निष्पन्न होऊ शकली नाही. सदरील ईसमाच्या डोक्यावर अर्धवट टक्कल पडलेले, अंगात काळा सदरा, पांढरा जिन्स, सावळा रंग असे वर्णन आहे. ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे आहे.