28.5 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeक्रीडाकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी गायिले गाणे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी गायिले गाणे

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या गाण्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुष्पा’ या चित्रपटामधील श्रीवल्ली हे गाणं गायिलं आहे. तर नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात ‘तुझसे नाराज नही ’ हे गाणं गायिलं आहे. श्रीवल्ली गाण्याचा गायक जावेद अली देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यासोबत गाणं गाताना दिसत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुष्पा’ चित्रपटातील गाणे गायिले. यावेळी उपस्थितांनी उपमुख्यमंत्र्यांना चांगलीच दाद दिली. तर देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी यांची गाणे म्हणण्याची वेळी आली. मग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी गाणे गायिले.

नितीन गडकरी यांनी जुने गाणे गायिले आहे. १९८३ मध्ये आलेल्या ‘मासूम’ या चित्रपटातील ‘तुझसे नाराज नही जिंदगी’ या त्यांनी गायिलेल्या गीताला उपस्थितांची दाद मिळाली.
नागपूरमधील उद्योजक प्यारे खान यांच्या मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन होते. या कार्यक्रमास नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी गीत गायिले. या दोन्ही नेत्यांचा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR