26.8 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रकेंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचा-याला गजानन मारणेच्या गुंडांकडून मारहाण

केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचा-याला गजानन मारणेच्या गुंडांकडून मारहाण

निकटवर्तीयच सुरक्षीत नसल्याचे सुळे यांचे विधान

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीये. पोलिसांकडून कडक कारवाई होत असली तरी पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला आहे. अशातच पुण्यात आता केंद्रीय मंर्त्यांच्या कर्मचा-यावरही कुख्यात गुंडाच्या टोळीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंड गजानन मारणे टोळीतील गुंडांनी केंद्रीय नागरी उद्यान मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तीला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुनच खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाती कर्मचा-याला कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीतील गुंडांनी क्षुल्लक कारणावरुन मारहाण केली. कोथरूड भागात गाडीचा धक्का लागल्याच्या वादातून मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडियाचे काम पाहणा-या देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली. या सगळ्या घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केंद्रीय मंर्त्यांचे निकटवर्तीय देखील सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे.

पुणे शहरात केंद्रीय मंत्री महोदयांचे निकटवर्तीय देखील सुरक्षित नाहीत. कुख्यात गुंडाने पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या स्टाफमधील काही कर्मचा-यांवर हल्ला करून जखमी केले. केंद्रीय मंत्रीमहोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. गेली काही दिवस पुण्यात गुंडांनी उच्छाद मांडला आहे. भररस्त्यतात रिव्हॉल्व्हर काढणे, हाणामारी प्रकार नेहमीच घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी यात तातडीने लक्ष घालून शहराची कायदे सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करतो असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR