परभणी : मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळे संपुर्ण जगात योग दिन साजरा करण्यात येत आहे. यावर्षीच्या थीम नुसार स्वत:साठी आणि समाजासाठी योग आहे म्हणून आपण स्वत: योग करावा व आपले आरोग्य उत्कृष्ठ ठेवावे. यातून आपल्या परिवाराला आणि समाजासाठीही त्याचा लाभ मिळेल असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले.
योगाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी आणि योगाचे महत्व समजावे म्हणून जगभरात दरवर्षी २१ जून हा दिवस हा जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी योगादिनासाठी एक विशेष थीम ठरवली जाते आणि यावर्षीच्या जागतिक योग दिनाची थीम स्वत:साठी आणि समाजासाठी योग ही आहे. यानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दि.२१ जुन रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माइल, प्राचार्या डॉ. जया बंगाळे, प्राचार्य डॉ. आर. बी. क्षीरसागर, सहयोगी अधिष्ठाता (निम्न शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ पी. आर. झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ऑर्ट ऑफ लिव्हिंगचे योगशिक्षक प्रा. दिवाकर जोशी व त्यांच्या पथकातील राजनंदिनी रेंगे, वैशाली पाटील, लक्ष्मण महाजन, राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार विविध आसने, प्राणायाम आदींचे सामुदायिकरित्या प्रात्यक्षिके करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. पी. आर. झंवर यांनी तर सुत्रसंचालन प्रा. शाहु चव्हाण आणि आभार डॉ डी एफ राठोड यांनी मानले. कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदींनी मोठया संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील प्रा. शाहु चव्हाण, डॉ डी एफ राठोड व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.