रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात गुलाबपुष्प अर्पण करून अनोखा निषेध

वसमत : प्रतिनिधी
वसमत शहरातील शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांनी अखेर नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरून रुग्णालयाकडे जाणाऱ्या वळणावर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडलेल्या मोठ्या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे-थोरावेकर यांनी चक्क खड्ड्यांनाच गुलाबपुष्प अर्पण करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार प्रहार केला.

रुग्णालयाच्या प्रवेशमार्गावरील नालीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गजाळ्याखाली योग्य बांधकाम न झाल्याने काही दिवसांतच नाली खचली आणि रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. परिणामी रुग्ण, गर्भवती महिला, डॉक्टर, रुग्णवाहिका, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

रोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर एखादा गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. तरीही संबंधित विभाग आणि कंत्राटदाराकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
निषेधावेळी प्रशांत लोखंडे-थोरावेकर यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, रस्ता व नालीचे काम तातडीने दर्जेदार पद्धतीने नव्याने करण्यात यावे. भविष्यात या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. याबाबत प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.

यासोबतच त्यांनी १५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण न झाल्यास १५ ऑगस्टपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, वसमत समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा थेट इशारा दिला. या अनोख्या आंदोलनामुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून, आता प्रशासन खड्डे बुजविण्यासाठी तातडीने पावले उचलणार का, की नागरिकांना आणखी संघर्ष करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41
Video thumbnail
DEVANI|संघर्ष,जिद्द आणि लोकविश्वासाचा चेहरा;रामलिंग शेरे
03:25

Latest news