पुणे : राज्याच्या काही भागांमध्ये भागांमध्ये थंडी जाणवू लागली आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर राज्यात पुढील काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर आजपासून राज्यात पुढील ४ ते ५ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी दोन दिवसांत म्हणाजेच २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मुंबई महानगराच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
तर या अवकाळी पावसामुळे शहरातील प्रदुषण काही प्रमाणात कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा आहे. मुंबईत कमाल तापमान ३३ ते ३४अंश सेल्सिअस दरम्यान राहील. यापूर्वी ८ आणि ९ नोव्हेंबरलाही येथे अवकाळी पाऊस झाला होता. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे पालघर परिसरात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
आजपासून राज्याच्या दक्षिणकडे असलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.