पुणे : राज्याच्या विविध भागात गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने पुन: एकदा हजेरी लावली. तर सोलापूरमध्ये हलक्या स्वरूपाचा भूकंपाचा धक्का जाणवला असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
पुणे, अमरावती, नागपूर आणि मराठवाड्यातील बहुसंख्य शहरे आणि परिसरात दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ झाली सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता त्यानंतर दुपारी ४ नंतर पावसाला सुरुवात झाली साधारणपणाने पाऊण तास शहरच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्यास मदत झाली. शहराबरोबर राज्याच्या विविध भागात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भ मराठवाड्याच्या भागात पावसाने हजेरी लावली असल्याची माहिती हवामान खात्याच्या सांगण्यात आली. अजून एक दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.