सोलापूर : शहर परिसरात सोमवार दि. २४ मार्च रोजी अवकाळी पाऊस पडला. सुमारे अर्धा पाऊण तास शहराच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली.
शहर परिसरात दुपारी १२ नंतर अनेक ठिकाणी आकाशात ढग दिसून येत होते. वातावरणात किंचित दमटपणाही जाणवत होता.
अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच दुपारी साडेचारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. प्रारंभी पंधरा-वीस मिनिटे जोरात नंतर सावकाश तीव्रता कमी करत पावसाने अर्ध्या पाऊण तास बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना व वाहन चालकांना आडोसा धरावा लागला.
सोलापूर शहरातील होटगी रोड परिसर, नई जिंदगी परिसर, अक्कलकोट नाका आदी भागात जोरदार पाऊस पडल्याची माहिती मिळाली. चौपाल सारख्या भागामध्ये बराच काळ नभांचा गडगडाट ऐकू येत होता. पावसामुळे आणि वा-यामुळे कर्णिक नगर भागातील झाड रस्त्यावर कोसळले. परिणामी रे या भागात रस्त्याची कोंडी होऊन काही काळ वाहतूक खोळंबली होती.