नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बनावट मार्केटिंग मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. याद्वारे भारतातील कॉल सेंटरमधून अमेरिकेसह अनेक देशांतील नागरिकांना लक्ष्य केले जात होते. तेथील नागरिकांची फसवणूक केली जात होती. सीबीआयने दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरातसह २४ ठिकाणी छापे टाकले. यावेळी सायबर क्राईम मॉड्यूलचा पर्दाफाश झाला आहे. २.२ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.