35.9 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeमहाराष्ट्रइन्स्टाग्रामवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ लिहील्याने गदारोळ

इन्स्टाग्रामवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ लिहील्याने गदारोळ

पुण्यातील तरूणीला पाकचा पुळका

पुणे : सोशल मीडियावर एका तरूणीने पाकच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने खळबळ माजली असून पुण्यातील येथील कोंढवा भागात राहणा-या एका तरूणीने इन्स्टाग्रामवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ लिहील्याचा आरोप असून त्या तरूणीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरूणी पुण्यातील एका कॉलेजध्ये शिकते आणि कोंढला येथील कौसरभाग भागात राहते.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करत १०० दहशतवाद्यांना ठार केले. मात्र यामुळे बिथरलेल्या पाकने भारतवरच प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने सर्व हल्ले रोखत पाकला धडा शिकवला. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकमधील तणाव वाढला आहे.

पोलिस कॉन्स्टेबल सुभाष जरांडे यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपी मुलीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे असे या प्रकरणाची पुष्टी करत पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितले.

सोशल मीडियावर पोलिसांची नजर
भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईनतर सोशल मीडियावर पोलिस सतत लक्ष ठेवून आहेत. याचदरम्यान या आरोपी तरूणीची एक आक्षेपार्ह पोस्ट इंस्टाग्रामवर समोर आली, ज्यामध्ये शेवटी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहिले होते.

विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
पोलिसांनी मुलीवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोप लावले आहेत, ज्यात कलम १५२ (भारताची अखंडता धोक्यात आणणे), कलम १९६ (समूहांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे), १९७ (राष्ट्रीय एकात्मतेविरुद्ध टिप्पण्या), २९९ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेली कृत्ये), ३५२ (जाणूनबुजून अपमान) आणि ३५३ (सार्वजनिक अशांतता निर्माण करणारी विधाने) यांचा समावेश आहे.

पुण्यात आंदोलन
या घटनेनंतर ‘सकल हिंदू समाज’च्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला असून या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिस संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत आणि सोशल मीडियावरील अ‍ॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR