16.9 C
Latur
Friday, November 29, 2024
Homeराष्ट्रीयहिंदूंवरील भाषणावरून लोकसभेत गदारोळ

हिंदूंवरील भाषणावरून लोकसभेत गदारोळ

हर हर महादेवचा जयघोष

नवी दिल्ली : आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा चालू आहे. या चर्चेच्या दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषणाची सुरुवात केली आणि संविधानाच्या आधारे मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात संविधानाची प्रत हातात घेऊन केली. या दरम्यान, राहुल गांधी यांनी एक विधान केले ज्यामुळे वाद निर्माण झाला. या विधानावर पीएम मोदींनी उभे राहून विरोध दर्शवला आणि संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर बाब असल्याचे सांगितले.

राहुल गांधींनी आपल्या भाषणात म्हटले, मोदीजींनी एका भाषणात सांगितले की हिंदुस्तानने कधीही कोणावर हल्ला केला नाही. कारण, हिंदुस्तान हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आमच्या महापुरुषांनी हे संदेश दिले – डरो मत, डराओ मत. शिवजी म्हणतात – डरो मत, डराओ मत… दुसरीकडे, जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात ते २४ तास हिंसा-हिंसा, नफरत-नफरत करतात. तुम्ही हिंदू नाही. हिंदू धर्मात स्पष्टपणे लिहिले आहे की सत्याचा साथ द्यावा.

राहुल गांधींनी आरोप लावला की त्यांच्यावर खोटे खटले चालवले गेले. ईडीने त्यांची चौकशी केली, त्यावेळी अधिकारीही हैराण झाले. इंडिया आघाडीच्या नेत्यांना जेलमध्ये ठेवण्यात आले. ओबीसी-एससी-एसटी वर्गाच्या हक्कांची बाजू मांडणा-यांवर -यांवर खटले दाखल केले जात आहेत.

राहुल गांधींनी दाखवला महादेवाचा फोटो
जेव्हा तुमच्यावर असे हल्ले होतात तेव्हा तुम्हाला आश्रय हवा असतो, असे राहुल गांधी म्हणाले. त्यामुळे आज मी भाजप-आरएसएसच्या लोकांना सांगू इच्छितो की, ज्या कल्पनेने आम्ही आणि संपूर्ण विरोधकांनी आमचा बचाव कसा केला. ही कल्पना कुठून आली आणि सरकारशी लढण्याची हिंमत कशी आली? यानंतर राहुलने भगवान महादेवाचा फोटो काढला आणि आम्ही येथे आश्रय घेतल्याचे सांगितले. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी जय महादेवच्या घोषणा दिल्या.

राहुल गांधींनी भगवान शिव यांना प्रेरणा मानत, विपरीत परिस्थितीत संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले. त्यांच्या डावा हातातील त्रिशूल अहिंसेचे प्रतीक आहे. आम्ही सत्याची रक्षा केली आहे कुठल्याही हिंसा न करता. भाजपावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांच्या दृष्टीने केवळ सत्ता महत्वाची आहे.

बिरला यांनी राहुल गांधींना थांबविले
राहुल गांधींनी लोकसभेत आपल्या संबोधनादरम्यान भगवान महादेवाचा फोटो दाखवला. यावर स्पीकर ओम बिरला यांनी त्यांना थांबवले नियम पुस्तिका काढली. राहुल गांधी म्हणाले की, सदनात आम्ही शिवजीचा फोटोही दाखवू शकत नाही का?, तुम्ही मला थांबवत आहात. माझ्याकडे आणखीही फोटो होते जे दाखवून सांगायचे होते की शिवजींनी कसे रक्षण केले.

जय संविधानाने सुरूवात
लोकसभेत राहुल गांधी बोलत होते. त्यांनी जय संविधान म्हणत आपले भाषण सुरू केले आणि म्हणाले की, छान वाटते की प्रत्येक दोन-तीन मिनिटांनी भाजपाचे लोक संविधान-संविधान म्हणत आहेत. आम्ही देशाच्या लोकांसोबत मिळून त्याची रक्षा केली आहे. संपूर्ण विरोधक ‘आयडिया ऑफ इंडिया’ चे संरक्षण करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR