मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित आहेत. तसेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उद्या शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवर निकाल देणार आहेत. निकालानंतर जर काही कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास काय उपाय योजना करायच्या याबाबतही वर्षावरील बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतं आहे.
या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस महासंचलाक रश्मी शुक्ला देखील उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील नियोजनावरही यावेळी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.