33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeअंतरराष्ट्रीयसीरियातील 'इराणी लक्ष्यांवर' अमेरिकेचे हवाई हल्ले

सीरियातील ‘इराणी लक्ष्यांवर’ अमेरिकेचे हवाई हल्ले

दमास्कस : काही दिवसापूर्वी सीरियामध्ये अमेरिकन तळांवर हल्ले करण्यात आले होते. अमेरिकन तळांवर झालेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सीरियातील ‘इराणी लक्ष्यांवर’ अमेरिकेने हवाई हल्ले केले आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स या सीरियावर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेचा हवाला देत पूर्व सीरियामध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान आठ इराण समर्थक सैनिक ठार झाल्याचे वृत्त दिले आहे. या हल्ल्यात एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती संघटनेने दिली असून त्यापैकी एक जण सीरियाचा तर दुसरा इराकचा आहे.

हे हवाई हल्ले सीरिया आणि इराकच्या सीमेजवळ असलेल्या पूर्व देर एझोर प्रांतातील मायादिन आणि अबू कमाल भागात करण्यात आले आहेत. यापूर्वी रविवारी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी म्हटले होते की, अमेरिकेने सीरियातील इराणशी संबंधित दोन लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. संरक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, मध्यपूर्वेतील अमेरिकन सैन्यावर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले आहेत. गेल्या तीन आठवड्यांत अमेरिकेच्या लष्कराने सीरियामध्ये हवाई हल्ले करण्याची ही तिसरी वेळ आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की, लक्ष्य करण्यात आलेले लक्ष्य इराणशी संबंधित आहेत.

अलीकडच्या काळात, मध्यपूर्वेतील अनेक अमेरिकन लक्ष्यांविरुद्ध हिंसक कारवाया वाढल्या आहेत. हे हल्ले करणाऱ्या गटांमागे इराणचा हात असल्याचा अमेरिकेचा विश्वास आहे. १७ ऑक्टोबरपासून इराक आणि सीरियामध्ये अमेरिकन लक्ष्यांवर ४५ हून अधिक हल्ले झाले आहेत. यामध्ये डझनभर अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत. या भागातील अमेरिकन सैन्यावरील हल्ले इस्राईल-हमास युद्धाशी संबंधित आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR